Home Breaking News • शाळेच्या पहिल्या दिवशी नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

• शाळेच्या पहिल्या दिवशी नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

138

• शाळेच्या पहिल्या दिवशी नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, बल्लारपूर

वरोरा : महारोगी सेवा समिती द्वारा आनंद माध्यमिक विद्यालय,आनंदवन येथे नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे बँड ने वाजतगाजत रॅली काढून मोठ्या सन्मानाने शाळेच्या प्रवेशद्वारावर महारोगी सेवा समिती चे विश्वस्त तथा शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुधाकर कडू व मुख्याध्यापिका विद्या गोखरे(टोंगे) यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तदनंतर उपस्थित मान्यवर आणि शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे यांनी केले.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी सुधाकर कडू यांनी विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलताना म्हणाले शाळेच्या पहिल्या दिवसाला उत्साह द्विगुणित व्हावा , नोकरी लागेल,पुढे जाईल म्हणून शिक्षण नाही.माणूस सुसंस्कृत व चांगला व्हावा यासाठी शिक्षण आहे.वृक्षवल्ली ही आरोग्यासाठी लाभदायक असून सकाळचे वेळेस ओझोन खाली असतो.जसा सूर्य प्रकाश तेज होतात तेव्हा ओझोन वर वर जात असतात.म्हणून वृक्षाला महत्व असून वृक्षाला देवता मानले आहे.विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे.शैक्षणिक प्रवासात प्रगतीसाठी धाव पुढे असली पाहिजे.आपल्या शिक्षण जीवनाकडे लक्ष देण्यापलीकडे बाह्य जीवनाकडे लक्ष देऊन सुसंस्कार घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.विद्यार्थ्यांच्या सेवेत शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना मोठे होणे सोपे जाते.माणूस माझे नाव,माणूस माझे नाव,पुढेच माझी धाव.असे बाबा आमटे यांचे सृजनशील विचार त्यांनी विषद केले.म्हणून प्रगतीसाठी धाव पुढे असली पाहिजे.माणूस सुसंस्कृत होण्यासाठी अध्ययनाचे व संस्काराचे पाठ घेतले जातात,ते विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे.आणि चांगले तेवढे घेण्याचे प्रयत्न करा.असे संदेशात्मक प्रतिपादन कडू सरांनी केले. विद्यार्थ्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली.तसेच सहा.शिक्षक प्रदीप कोहपरे यांनी शाळेचा पहिला दिवस व विद्यार्थी की व्यथा ह्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका विद्या गोखरे (टोंगे)सह सहा.शिक्षिका स्मिता काळे(ठेंगणे), सहा.शिक्षिका संचिता नीबुद्धे यांनी केले.तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी राहुल नाकाडे व संदीप कोडवते यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन सहा.शिक्षक हर्षल चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन सहा.शिक्षक आशिष येटे यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.