Home Breaking News घुग्घुस प्रियदर्शिनी कन्या विद्यालय शाळेने केले विद्यार्थीनीचे बैलगाडीतून आगमन

घुग्घुस प्रियदर्शिनी कन्या विद्यालय शाळेने केले विद्यार्थीनीचे बैलगाडीतून आगमन

195

घुग्घुस प्रियदर्शिनी कन्या विद्यालय शाळेने केले विद्यार्थीनीचे बैलगाडीतून आगमन

सुवर्ण भारत: पंकज रामटेके 
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय, घुग्घूस येथे दि.२३ जुन २०२५ सोमवार रोजी वर्ग ५वी ते ८वी च्या नवप्रवेशित विदयार्थीनींचे बैलगाडीतून आगमन करुन लेझीम व बॅन्ड पथकात, पुष्पवर्षा करुन स्वागत करण्यात करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याद्यापिका सौ. अनू चोथे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय आसुटकर,डॉ मंगेश जमदाडे, समाजसेवक प्रेमलालजी पारधी, केंद्रप्रमुख दागमवार,श्रीमती रणदिवे, श्रीमती कौराशे, पर्यवेक्षक फाल्गुन खामणकर, प्रा. प्रकाश सातार्डे, प्रा. वैशाली जोशी व गणेश मत्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी विदयार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. बलवंत विखार यांनी तर श्री. संजय माहुरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षीका, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थीनी यांनी अथक परिश्रम घेतले.