Home Breaking News • जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा-सुदाम राठोड

• जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा-सुदाम राठोड

256

• जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा-सुदाम राठोड

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

जिवती : तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने दि. 07 डिसेंबर 2023 ला उपोषण केले होते. माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ जिवती येथील ग्रामीण रुग्णालय सुरु करू असे आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्यात आले,तरी दोन वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा ग्रामीण रुग्णालय सुरु झालेला नाही, म्हणून आरोग्य विभाग उपसंचालक नागपूर यांना निवेदन देऊन आपण स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ जिवती येथील ग्रामीण रुग्णालय सुरु करून जिवती तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचि समस्या सोडवावी अशी विनंती जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीचे सदस्य सुदाम राठोड व विजय गोतावळे यांनी केली आहे.