Home Breaking News कै .आण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय कुंबेजरी येथे “शाळा प्रवेशोत्सव”उत्साहात साजरा

कै .आण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय कुंबेजरी येथे “शाळा प्रवेशोत्सव”उत्साहात साजरा

196

• कै .आण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय कुंबेजरी येथे “शाळा प्रवेशोत्सव”उत्साहात साजर

सुवर्ण भारत:कृष्णा चव्हाण 
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

जिवती : कै. अण्णाभाऊ साठे माध्यमिक तथा

उच्च माध्यमिक विद्यालय, कुंभेझरी येथे सन 2025-2026 या शेक्षणिक सत्रा करीता मोठया उत्सहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक लोडे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वावरे सर, प्रा. गोतावळे सर, प्रा. मालेकर सर, श्री. जिवणे सर, पेंदोर सर, अहिरकर सर, कु, बुच्चे मॅडम, कु. नंदनवार मॅडम यांनी भूषविले. नवागतांचे स्वागत करण्याकरीता शाळेच्या गेट समोर रांगोळी व फुग्यानी सुंदर अशी सजावट करण्यात आली. त्या नंतर प्रत्येक विधार्त्याचे व नवागतांचे औक्षण करण्यात येऊन त्यांना पुष्पगुछ, टिळा लावून स्वागत करण्यात आले.नवीन प्रवेश घेतलेल्या विधार्त्याना शालेय पुस्तक वितरण करण्यात आले. तसेच एक पेड माँ के नाम या उपक्रमाद्वारे शालेय परिसरात वृक्षारोपण केले.
लोडे सर यांनी नवीन उत्सहाने, नवीन ऊर्जानी आलेल्या विद्यार्थ्यांनी आपला सर्वागीन विकास करावा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही या विषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. गोतावळे सर यांनी सुद्धा शिक्षणा तून विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याबद्दल जागरूक असावे व चांगली मूल्ये रुजवावी.
विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खाऊ देण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षक वाघमारे प्रा. वावरे, प्रा. गोतावळे,प्रा. मालेकर, पेंदोर सर, जिवणे सर, अहिरकर सर, कु, बुच्चे मॅडम, कु, नंदनवार मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी मोसेस बाबू, नामवाड, सेवक, प्रकाश मोतेवाड, अनिल मोतेवाड, नित्यानंद मोतेवाड व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले तर आभार पेंदोर सर यांनी मानले