Home Breaking News • छत्रपती शाहू महाराज समता, बंधुता यांची शिकवण देणारे थोर समाजसुधारक: विवेक...

• छत्रपती शाहू महाराज समता, बंधुता यांची शिकवण देणारे थोर समाजसुधारक: विवेक बोढे • आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

70

• छत्रपती शाहू महाराज समता, बंधुता यांची शिकवण देणारे थोर समाजसुधारक: विवेक बोढे

• आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

 

घुग्घुस: आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गुरुवार, २६ जुन रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी अभिवादन केले.

छत्रपती शाहू महाराज समता, बंधुता यांची शिकवण देणारे दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक होते. त्यांनी दीन-शोषित समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली. समाजातील वंचित घटकांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आरक्षण व्यवस्था उदयास आणली, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले.

यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जेष्ठ नेते चिन्नाजी नलभोगा, संदीप तेलंग, हनुमान खडसे, गणेश अँड्रस्कर, मनोज महेशकर, उगम बुरड, आयुष नागरकर, निखिल आत्राम, राकेश उरकुडे, मंगेश उलमाले, गौरव तुराणकर, आकाश वेलादी, सविता अँड्रस्कर, खुशबू मेश्राम, भारती परते, नेहा कुम्मरवार, प्रिया नागभीडकर, स्वाती गंगाधरे, मयुरी धुर्वे, आदींची उपस्थिती होती.