Home Breaking News • चक्री व्याजाच्या स्वरूपाने संपूर्ण घुग्घुस शहरतील सामान्य जनतेची महावितरण मार्फत लूट...

• चक्री व्याजाच्या स्वरूपाने संपूर्ण घुग्घुस शहरतील सामान्य जनतेची महावितरण मार्फत लूट – शिवसेना (उबाठा गट)

172

चक्री व्याजाच्या स्वरूपाने संपूर्ण घुग्घुस शहरतील सामान्य जनतेची महावितरण मार्फत लूट – शिवसेना (उबाठा गट)

सुवर्ण भारत : पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : घुग्घुस येथील महावितरण कार्यालयात शिवसेवा (उबाठा), घुग्घुस यांच्या वतीने नागरिकांच्या समस्या मांडत वीज बिलातील व्याज कमी करण्याची आणि मीटर रीडिंगचा फोटो थेट वीजबिलावर छापण्याची मागणी करत निवेदन सादर करण्यात आलं.

निवेदनात नमूद करण्यात आलं की, अनेक नागरिक वेळेवर वीज बिल भरत असतानाही त्यांच्या बिलांमध्ये चक्री व्याजाचा समावेश केला जात आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच, मीटर रीडिंग चुकीचं घेतल्यामुळे अनेकदा बिल चुकीचं येतं. त्यामुळे पारदर्शकता राखण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी मीटर रीडिंग घेतल्याचा फोटो वीज बिलावर छापणं गरजेचं आहे.

या वेळी बोलताना अमित बोरकर यांनी सांगितलं की, सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण लक्षात घेता वीज बिलातील व्याज कमी करणं आवश्यक आहे. मीटर रीडिंगचा फोटो छापल्यास गैरसमज टाळता येतील आणि महावितरण व ग्राहक यांच्यात विश्वास वाढेल. त्यांनी यासोबतच रात्रभर होणाऱ्या वीज खंडनाचाही मुद्दा उपस्थित करत, लहान मुलांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

हे निवेदन कनिष्ठ अभियंता, महावितरण कार्यालय, घुग्घुस यांच्याकडे कारवाईसाठी सादर करण्यात आलं असून, याची प्रत कलेक्टर, चंद्रपूर; वरिष्ठ अभियंता, महावितरण कार्यालय,चंद्रपूर आणि ब्रीथ ऑफ लाईफ मल्टीपरपज सोसायटीचे अध्यक्ष व संस्थापक यांना देखील पाठवण्यात आली आहे.

या वेळी शिवसेना (उबाठा) शहर अध्यक्ष चेतन (बंटी)घोरपडे,माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके, अमित बोरकर,प्रणयकुमार बंडी आदी मान्यवर उपस्थित होते.