Home Breaking News #Varora • स्टेट बँक ऑफ इंडिया वरोरा शाखा द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन

#Varora • स्टेट बँक ऑफ इंडिया वरोरा शाखा द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन

99

#Varora
• स्टेट बँक ऑफ इंडिया वरोरा शाखा द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन

वरोरा : स्थानीय स्टेट बँक वरोरा शाखेद्वारे बँकेच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एसबीआय मुख्यालयाच्या आदेशानुसार शाखेच्या स्थापनेच्या दिवशी “रक्तदान महादान” या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे असा आदेश देण्यात आला होता त्यानुसार शाखेद्वारे रक्तदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानीय आमदार श्री करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना प्रबोधन करताना या कार्यक्रमाला पुण्यकर्म असे संबोधन करून त्यांनी सर्व सहभागी लोकांचे अभिनंदन केले. या शिबिरात एकंदर 45 लोकांनी रक्तदान करून कार्यक्रमाला यशस्वी केले. स्टेट बँक शाखा चे व्यवस्थापक श्री रतन गोस्वामी , बँकेचे कर्मचारी तसेच वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता व रिटायर्ड रेल्वे विभागाचे इंजिनियर श्री संजीव सक्सेना तसेच अंशुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वरोरा येथील अनेक नागरिकांनी सक्रिय सहभाग दिला. यामध्ये विनोद मालू , रेल्वे युनियनचे सदस्य आनंद येटॆ, महेश लोंढे, पंकज वैद्य, शुभम येटॆ, बँकेचे कर्मचारी मुकेश निमसटकर, सचिन रॉय, सनी वाळके ,संकेत बालचिन ,राहुल खंडारे ,शेखर शेट्टी , गौरव मेश्राम , विवेक गयनेकर आणि शेखर शेट्टी यांच्याद्वारे स्वेच्छेने रक्तदान करण्यात आले. याप्रसंगी उत्तर भारतीय मोर्चा , चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष व रेल्वेचे प्रतिष्ठित कंत्राटदार श्री दीपक सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसबीआय कर्मचारी डी एन डोंगरे , पांडुरंग गावंडे , संजय बोधे ,अंशुल सक्सेना , शुभम पवार यांनी सक्रिय योगदान दिले.
लाईफ लाईन रक्तपेढी, नागपूरचे संचालक डॉ. हरिश वरभे यांच्या निर्देशनात रवी गजभिये आणि त्यांच्या रक्तपेढीच्या कर्मचाऱ्याद्वारे रक्त संकलन करण्यात आले.