Home Breaking News #वरोरा • अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

#वरोरा • अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

95

#वरोरा
• अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : आनंद माध्यमिक विद्यालय,आनंदवन येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अमली पदार्थाचे सेवन न करण्याची व मादक पदार्थाच्या आहारी न जाण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.सहा.शिक्षक आशिष येटे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
विद्यार्थ्यांनी भविष्यात कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन न करण्याचा तसेच अशा पदार्थापासून दूर राहून निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला.
गाव,शहर,तालुका,जिल्हा, राज्य आणि देश नशामुक्त करण्यासाठी मित्र ,पालक व परिसरातील लोकांना दारू,ई – सिगारेट, चरस,गांजा व अन्य मादक पदार्थापासून दूर ठेवण्याचा आणि याबाबत जनजागृती करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.नशामुक्ती चळवळीत सक्रिय सहभागी होण्याचीही शपथ त्यांनी घेतली.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे,सहा.शिक्षक प्रदीप कोहपरे,स्मिता काळे,आशिष येटे, संचिता निबुद्धे ,शिक्षकेत्तर कर्मचारी लिपिक राहुल नाकाडे,परिचर संदीप कोडवते यांची उपस्थिती होती.