• रोटरी क्लब वरोरा कडून डॉक्टर दिवस साजरा
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : राष्ट्रीय डॉक्टर्स दिन हा वैद्यांच्या वैयक्तिक जीवनात आणि समूदायासाठी योगदान ओळखण्यासाठी साजरा घेणारा दिवस आहे.सार्वजनिक आरोग्यामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेवर भर देतो.विशेषतः साथीच्या आजारासारख्या संकटाच्या काळात जिथे त्यांचे कौशल्य आणि नेतृत्व महत्वाचे असते.आरोग्य सेवा ही एक सामुदायिक प्रयत्न आहे आणि सार्वजनिक आरोग्य राखण्यात डॉक्टरांची भूमिका महत्वाची असते.
१ जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स दीन देशातील सर्वात प्रतिष्ठित डॉक्टरांपैकी एक आणि पच्छिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळल्या जातो.डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच आहेत.स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणत्याही परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्न करतो.
वरोऱ्यात राष्ट्रीय डॉक्टर दिवसा निमित्त रोटरी क्लब चे वतीने प्रत्येक आरोग्य अधिकाऱ्यांना सलाम म्हणून डॉ.हेमंत खापने,डॉ.विवेक तेला,डॉ.राहुल शेंद्रे,डॉ.मत्ते ,डॉ.लांबट,डॉ.भेंडे,आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.खुजे यांना मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी रोटरी क्लब चे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटे योगेश डोंगरवार,ए जी.अमित.लाहोटी,नितेश जयस्वाल,अमित नाहर,चेतन बजाज,राम लोया ,सचिन जीवतोडे यांची उपस्थिती होती.
