• कुठे बत्ती गुल… तर, कुठे दिवस-रात्र पथदिवे सुरू…
• वरोरा महावितरण कुंभकर्णी झोपेत

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांना उकाळ्या पासून काहीसा दिलासा मिळाला आहे ,मात्र अलिकडे महावितरणच्या बेजबाबदार पणामुळे नागरिकांना काही दिवस बत्ती गुल, विजेच्या लपंडावाचा नाहक त्रास सहन करावा लागला.उकाड्यापासून व विजेच्या लपंडाव पासून नागरिकांची सुटका झाली असली तरी तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पोहाणे कॉलनी परिसरातील नागरिक वेगळाच अनुभव घेत असुन,मागील आठ दिवसापासून परिसरातील पथदिवे दिवस-रात्र अखंडपणे तेवत असल्याचे बघत आहे,सदर प्रकार गेल्या आठ दिवसापासून सुरु असून वरोरा महावितरण या पथदिवे दिवसाढवळ्या सुरू असताना याकडे पथदिवे बंद करण्याची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यावर आहे ते कर्मचाऱ्याला भान का राहिले नाही.असा प्रश्न उपस्थित होत आहे.किंबहुना कुंभकर्णी झोपेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची बेजबाबदारपणा पथदिवे सुरू असण्यास कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे. दिवसाढवळ्या प्रकाश देणारे पथदिवे कधी बंद होणार असा प्रश्न बोर्डा गावातील सुज्ञ नागरिक विचारत आहे,
