Home Breaking News #varora • इनरव्हील क्लब वरोरा कडून डाक्टर डे साजरा

#varora • इनरव्हील क्लब वरोरा कडून डाक्टर डे साजरा

167

#varora
• इनरव्हील क्लब वरोरा कडून डाक्टर डे साजरा

वरोरा : इनरव्हील क्लब वरोरा शहरात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून समाजातील पीडित,शोषित लोकांना सहकार्याची भावना ठेऊन त्यांना मदत करण्याचे दायित्व सुद्धा पार पाडतात.तसेच समाजातील प्रत्येक घटकांचा त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचा आदर,सन्मान ,सत्कार करतात.हे विशेष.
रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे स्मुदायासाठी योगदान ओळखण्यासाठी साजरा होणारा डॉक्टर दिवस हा डॉक्टरांच्या कार्याचा मान सन्मान व्हावा.कारण सार्वजनिक आरोग्य राखण्यात डॉक्टरांची भूमिका महत्वाची असते.तसेच डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच आहे.ह्या उद्देशाने डॉक्टर हे सत्काराचा मानकरी ठरतात.प्रत्येक डॉक्टरांना सलाम म्हणून राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त इनरर्व्हील ग्रुप वरोरा तर्फे डॉ. साक्षी उपलेंचवार,डॉ.सागर वझे,डॉ.मीरा वझे,डॉ.राहुल धांडे,पौर्णिमा धांडे, डॉ.आशिष चवले यांना मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी. इनरव्हील ग्रुपचे.नवनिर्वाचित अध्यक्ष अनु डोंगरवार,संध्या बारई,दिपाली माटे,पूनम जयस्वाल,पूजा गोठी,दर्शना मोदी, आभा सायरे उपस्थित होते.