Home Breaking News ” शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून गटशिक्षणाधिकारी चहारे यांचा सन्मान “

” शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून गटशिक्षणाधिकारी चहारे यांचा सन्मान “

202

” शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून गटशिक्षणाधिकारी चहारे यांचा सन्मान ”

वरोरा : ज्ञानेश्वर विठ्ठलराव चहारे, 39 वर्षे 5 महिने 7 दिवसांच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० जून २०२५ ला पंचायत समिती वरोरा येथून गटशिक्षणाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले. आज दि. 03 जुलै ला जिल्हा परिषद चंद्रपूर येथे त्यांचा सपत्नीक सहपरीवार शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. अश्विनी सोनवणे (केळकर) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतांना त्यांनी सेवेच्या शेवटच्या क्षणापर्यंत पोटतिडकीने काम केले . बरेचदा शनिवार रविवार सुद्धा ते कार्यालयातच असायचे . आपल्या कार्यकाळात त्यांनी सर्व कर्मचा-यांसोबत शिक्षकांसोबत आपुलकीचे नाते कायम केले . एका अतिशय कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिका-याच्या सेवेपासून पं. स. वरोरा मुकणार आहे . त्यांचे कार्य सदैव सगळ्यांच्या स्मरणात राहील . त्यांना सर्व कर्मचारी अधिकारी तथा शिक्षकांनी पुढील सुखी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या .