Home Breaking News घुग्घुस संत श्री. साईबाबा बहुउद्देशीय मंडळातर्फे डाॅ.सुरेश कोल्हे यांच्या सत्कार

घुग्घुस संत श्री. साईबाबा बहुउद्देशीय मंडळातर्फे डाॅ.सुरेश कोल्हे यांच्या सत्कार

80

घुग्घुस संत श्री. साईबाबा बहुउद्देशीय मंडळातर्फे डाॅ.सुरेश कोल्हे यांच्या सत्कार

घुग्घुस : डॉ.सूरेश कोल्हे यांची दि
२ जुलै २०२५ रोजी घुग्घुस जिल्हा चंद्रपूर येथे ४७ वर्षे रुग्णांची अविरत सेवा पूर्ण झाली ही एक मोठी महत्त्वाची उपलब्धता आहे.या काळात अनेक आजारी रुग्णांना सेवा मिळाली व त्यांचे जीवन सुधारले आणि रात्रंदिवस रुग्णसेवा सुरू केली यामध्ये सर्वात मोठे योगदान आहे.
डाॅ.सुरेश कोल्हे यांनी कोरोना काळात रुग्णांना तपासणी करण्यास कोणीही तयार होत नव्हते अशा वेळेस स्वतःच्या जीवाची कुटुंबाची परवा न करता रात्रंदिवस कोरोना रुग्णांची अविरत सेवा सुरू ठेवली व रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा व्रत घेऊन ते रुग्णांची सेवा अविरत करत होते त्यांच्या सेवेचा ध्यास घेऊन आज डाॅ.सुरेश कोल्हे यांच्या मुलगा हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत झाली त्यामध्ये डॉ. ऋषिकेश कोल्हे एम.बी.बी.एस. एम.डी. हे सुद्धा सरांच्या पावलावर पाऊल ठेवून रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून समाजकार्य करत आहे त्यांच्या या कार्याला प्रभावित होऊन संत श्री. साईबाबा बहूऊददेशिय संस्था घुग्घुस अध्यक्ष गणेश शेंडे,उपाध्यक्ष गणेश वझे, शंकर कामतवार,पंकज बावणे,सचिन बोंडे , श्रीकांत पतरंगे यांनी डाॅ.सुरेश कोल्हे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, विनंती करण्यात आली की आपण रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजून अविरत आपले कार्य सुरू ठेवा व बाबासाहेब आपल्याला उदंड आयुष्य देवो व सर्व जनतेतर्फे आपलं नेहमी कौतुक हो अशी एक भगवंत चरणी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली व तसेच सर्व घुगुस्वासियतर्फे त्यांच्या या कार्याबद्दल अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.