• जिवती पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक जाधव स्वागत केले
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

जिवती : जिवती पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक जाधव यांनी नुकतेच आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतरित्या स्वीकारला आहे. त्यांच्या रुजू होण्याच्या औचित्याने स्थानिक समाजबांधव तसेच पदाधिकारी श्रीदास राठोड आणि आनंद कदम यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत व मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांशी सामाजिक व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आपल्या कार्यकाळात नागरिकांच्या सुरक्षेची हमी आणि सामाजिक ऐक्य टिकविण्यास प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या कार्यकाळात पोलीस प्रशासनातील पारदर्शकता व जनविश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वासही याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.


