Home Breaking News Beed Dist @ स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणाची शिरूर तालुक्यात पुन्हा पुनरावृत्ती व्हायला...

Beed Dist @ स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणाची शिरूर तालुक्यात पुन्हा पुनरावृत्ती व्हायला नको– शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा/ हटकरवाडी/ भानकवाडी परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प बंद करणार — सोपान मोरे

235

Beed Dist @
स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणाची शिरूर तालुक्यात पुन्हा पुनरावृत्ती व्हायला नको–

शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा/ हटकरवाडी/ भानकवाडी परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प बंद करणार —
सोपान मोरे

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
80 87 17 57 12

स्वर्गीय संतोष देशमुख प़करणाची शिरुर कासार

तालुक्यात पुन्हा पुनरावृत्ती व्हायला नको ,शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा /हटकरवाडी /भानकवाडी परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प बंद करा असे आवाहन प्रसिद्धस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शिवसेना तालुकाप्रमुख सोपान मोरे यांनी केले .
पुढे सांगितले की , सौरऊर्जा प्रकल्पाची दादागिरीने शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी हडपल्या .बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प लुटारुची टोळी शेतकऱ्यांच्या जमिनी जोर जबरदस्तीने लाटल्या गेल्या. आदिलशाही/ मोगल शाही /फिरंगी पोर्तुगी/ इंग्रज यांच्या काळात देखील हाच प्रकार असायचा हीच मोगलशाही असायची म्हणून छत्रपती शासन लागू झाले .आणि आजही तीच वेळी आली असं वाटायला लागले . कारण स्वतःच्या बाप दादाच्या जमिनीमध्ये जर स्वतःलाच पाऊल ठेवता येत नाही तर ही गुलामीच . पण याद राखा शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका प्रमुख सोपान मोरे या नात्याने आम्ही हा प्रकल्प बंद केल्याशिवाय राहणार नाही .
कारण पर राज्यातून येऊन आपल्या शिरूर कासार तालुक्यामधील हटकरवाडी , भानकवाडी या गावाच्या डोंगर माथ्यावर येऊन त्या शेतकरी बांधवांच्या जमिनी हडप करीत असतील , त्यांच्या जमिनीमध्ये त्यांच्याच बापाच्या जमिनीमध्ये जर समजा हा पर राज्यातून येऊन माणूस त्या शेतकरी बांधवांना जमिनीमध्ये येऊ देत नसेल तर , मग मी तरी का हातामध्ये दांडके घेऊन याची सौर ऊर्जा कंपनी फोडून शिरूर तालुक्यातून हद्दपार का करू नये ? असा संतप्त सवाल केला .
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , यांच्या आदेशाने विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे , शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे , संपर्कप्रमुख बीड जिल्हा परशुराम जाधव , संपर्कप्रमुख डॉक्टर लक्ष राज सानप , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर या सर्वांच्या सहकार्याने शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा , हटकरवाडी, भानकवाडी परिसरातील शेतकऱ्यावर जो अन्याय, दडपशाही ,हुकुमशाही सौर ऊर्जा कंपनी कडुन चालू आहे , ती
आम्ही उधळून लावुन भानकवाडी परिसरातील सौरऊर्जा हा प्रकल्प आम्ही बंद करणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिरुर कासार तालुकाप्रमुख सोपान मोरे यांनी पत्रकात सागितले आहे .