Home Breaking News • महामार्ग 25 जुलै पर्यंत समस्या मार्गी लावा • अन्यथा रस्त्यावर...

• महामार्ग 25 जुलै पर्यंत समस्या मार्गी लावा • अन्यथा रस्त्यावर उतरणार हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांचा इशारा

117

• महामार्ग 25 जुलै पर्यंत समस्या मार्गी लावा

• अन्यथा रस्त्यावर उतरणार हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांचा इशारा

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

अहेरी:- राष्ट्रीय महामार्ग आष्टी ते लगाम, आलापल्ली आणि आलापल्ली ते सिरोंचा महामार्ग तसेच आलापल्ली ते मुलचेरा मार्ग व अहेरी येथील प्राणहिता ते गांधी चौक पर्यंतचा रस्ता त्वरित बनवावे न बनविल्यास 25 जुलै नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
पत्रकात हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी नमूद केले आहे की, अधिकारी व कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणा मुळे रस्त्यांचे कामे करण्यात दिरंगाई झाले आहे, त्यामुळे नागरिक व प्रवाशांना नाहक्क त्रास सहन करावे लागत आहे, कामाला मंजुरी , निधी उपलब्ध असतानाही कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे दुर्लक्षितपणा मुळे रस्त्यांचे कामे झाले नाही असा थेटआरोप करून आता दिरंगाई खपवून घेतल्या जाणार नाही 25 जुलै पर्यंत कामे मार्गी न लावल्यास रस्त्यावर मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे गर्भगळीत इशारा थेट आमदाराचे पुत्र तथा अहेरी पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य, युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
पुढे त्यांनी विद्युत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी अहेरी येथील नवीन 33 के. व्हि. विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण करावे, अहेरी येथील उभारण्यात आलेले महिला व बाल रुग्णालयात कर्मचाऱ्यांची तात्काळ पदभरती करून आरोग्य सेवेसाठी रुग्णालय खुले करावे, जबरानजोत, वनजमिनीवरील शेतकऱ्यांना दरवर्षी धानाचे बोनस देण्यात येते परंतु यंदा बोनस मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे त्यामुळे तात्काळ धानाचे बोनस देण्यात यावे, प्रामुख्याने अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील रखडलेले रस्ते, पुलांचे काम तात्काळ करण्यात यावे 25 जुलै पर्यंत कामांना सुरुवात न झाल्यास व मार्गी न लागल्यास रस्ते तथा विकास कामे आणि अन्य विविध रास्त मागण्यांना घेऊन जनआंदोलन उभारण्याचा इशारा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.

या आधी धडक देऊन “अल्टिमेटल” दिले!

या आठवड्यात युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम व त्यांच्या अर्धांगिनी डॉ. मिताली आत्राम यांनी कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा कचेरीतील वरिष्ठ अधिकारी तसेच अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील प्रत्येक तालुका स्थळी धडक व भेटी देऊन अधिकाऱ्यांना वेळीच कामे पूर्ण करण्याचे “अल्टिमेटल ” अर्थात “वेट अँड वॉच” नंतर म्हणजेच 25 जुलै नंतर मोठी आक्रमक भूमिका घेणार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे दस्तुरखुद्द आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचे पुत्र तथा स्नुषा रस्ते व विकासकामांसाठी सतत दौरे व कामांचा मागोवा घेत असल्याने व प्रसिद्धीपत्रकातून “आंदोलनाचा थेट इशारा” दिल्याने प्रशासन व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागतील का याकडे सर्वांचे नजरा लागले आहेत.