Home Breaking News घुग्घुस संत श्री.साईबाबा बहुउद्देशीय मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

घुग्घुस संत श्री.साईबाबा बहुउद्देशीय मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

184

घुग्घुस संत श्री.साईबाबा बहुउद्देशीय मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : गुरुपौर्णिमा चे औचित्य साधून दि.१० जुलै २०२५ गुरूवार रोजी दरवर्षीप्रमाणे संत श्री.साईबाबा बहुउद्देशीय संस्था नगर परिषद जवळ घुग्घुस येथे गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोर जोरगेवार यांचे समर्थक भा.ज.पा.नेते आशीष मासीरकर, काँग्रेस नेते रोशनभाऊ पचारे,पवन आगदारी, शिवसेना (उबाठा) अध्यक्ष चेतन (बंटी) घोरपडे, सुधाकर चिकनकार, योगेश भादककर, युवा नेते अमित बोरकर, मधुकर मालेकर, निळकंठ थेरे यांच्या उपस्थितीत श्री.साईबाबा यांच्या प्रतिमेस पूजन-अर्चन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले.तसेच द्विपजवलीत करण्यात आले घटस्थापना ठिक बारा वाजता यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता करण्यात आली व सायंकाळी पाच ते दहा वाजेत दरम्यान भव्य महाप्रसादाला सुरुवात झाली व तसेच पुनवट येथील पदावली भजन साई भक्तांनी उत्कृष्ट रित्या सादर केले सदर मंडळाचे हे तिसरे वर्ष असून या मंडळाच्या माध्यमातून जनसेवेचे पवित्र कार्य अविरत सुरू आहे समाजाच्या कुठल्याही समस्या असो दिंन दलीत गोरगरीब शेतकरी शेतमजूर अठरापगड जातीच्या लोकांच्या सेवा असो लहान विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असून नोटबुक वाटप असो की आजारी रुग्णांना फळ वाटप असो गावातील सांडपाण्याचा प्रश्न असो स्वच्छ करण्याचा प्रश्न असो की फवारणीचा प्रश्न असो केवळ एक संस्था म्हणून कार्यरत नसून ही सामाजिक संस्था म्हणून कार्यरत आहे याचे सर्व कारण या गावातील संपूर्ण नागरिकाचे सहकार्य नेहमी आमच्या संस्थेला मिळत राहते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे,उपाध्यक्ष गणेश वझे,कोषाध्यक्ष शंकर कामतवार,सचिव पंकज बावणे, संघटक सचिनजी बोंडे,सहसचिव श्रीकांत पतंगे तसेच तुषार बोबडे,अजय उपाध्ये, रघुनाथ धोंगडे,साहिल,अरविंद पथाडे, बाबूजी कामतवार,मंगेश पचारे, अनिल कामतवार, बोरसरे, राजन धाबेकर,स्वप्निल झाडे,महेश किनाके, दिपक पेदोर,पंकज धोटे व समस्त गावकरी यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन कार्यक्रम संपन्न झाला.