Home Breaking News #chandrapur • वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांतर्फे २० जुलैला धरणे प्रदर्शन •...

#chandrapur • वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांतर्फे २० जुलैला धरणे प्रदर्शन • महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा घुग्घुस कार्यालयात घेण्यात आली पत्रकार परिषद

202

#chandrapur

• वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांतर्फे २० जुलैला धरणे प्रदर्शन

• महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा घुग्घुस कार्यालयात घेण्यात आली पत्रकार परिषद

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

 

#घुग्घुस: येथील वेकोलिचे सेवानिवृत्त कामगार व बहुउद्देशीय सिनियर सिटीजन आधार संस्था, घुग्घुस तर्फे २० जुलै रोजी सकाळी १० वाजता राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयापासून ते नगर परिषद कार्यालयापर्यंत मोर्चा व धरणे प्रदर्शन विविध मागण्यासाठी करण्यात येणार आहे अशी माहिती बहुउद्देशीय सिनियर सिटीजन आधार संस्था, घुग्घुसतर्फे रविवार, १३ जुलै रोजी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.

वेकोलि वणी क्षेत्राच्या कॉलरी नं. १ येथील जिल्हा परिषदेच्या मराठी व तेलगू माध्यम प्राथमिक शाळेचे तेथून स्थानांतरण करून नगर परिषद जवळील जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत जोडणे, घुग्घुसची खुली कोळसा खाण व नकोड्याची खुली कोळसा खाण बंद करण्यात आली आहे परंतु वेकोलि वणी क्षेत्रातर्फे तसे आदेश काढण्यात आले नाही. तरी सुरु असलेल्या कोळसा खाणीच्या परिसरातून मुंगोली कोळसा खाणी पासून ते घुग्घुस रेल्वे सायडींग पर्यंत रेल्वे रूट टाकण्यात आले असून हे रेल्वे रूट धोकादायक असल्याचा पत्रकार परिषद मध्ये आरोप करण्यात आला आहे.तसेच आठवडी बाजारासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे, लॉयड्स मेटल्स व एसीसी (अदानी )सिमेंट कंपनीची जडवाहतूक शहरा बाहेरून काढण्यात यावी, सि. पी. आर. एम.एस. च्या सदस्यांसाठी वेलफेअर बोर्डद्वारे व्यक्तीगत औषधी ठेवण्यासाठी दरवर्षी २ लाख रुपये देण्यात यावे अश्या विविध मागण्यापूर्ण करण्यासाठी मोर्चा काढून धरणे प्रदर्शन करण्यात येणार आहे.या सर्व मागण्यासाठी बहूउद्देशिय सिनियर सिटीजन आधार संस्था, घुग्घुस व वेकोलिच्या सेवानिवृत्त कामगारांतर्फे याबाबतचा पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करण्यात आला आहे परंतु याकडे प्रशासनातर्फे दुर्लक्ष केले त्यामुळे विविध प्रलंबित मागण्यापूर्ण करण्यासाठी धरणे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नुने, उपाध्यक्ष नरसय्या तांड्रा, सचिव प्रभाकर लिंगमपेल्ली, कोषध्यक्ष रामय्या मासा, सदस्य शंकर बंडी, देवीदास पुनगंटी, दर्शन तालापेल्ली, सूर्यभान आंबट उपस्थित होते.