• हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी सुभाष सावकार गोंड्रावार यांचे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले
• श्रद्धांजली वाहिले व परिवाराचे सांत्वन केले
सुवर्ण भारत: शंकर महाकाली

अहेरी :- तालुक्यातील बोरी येथील प्रसिद्ध व्यापारी सुभाष सावकार गोंड्रावार यांचे सोमवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास हृदय विकारामुळे निधन झाले. निधनाची बातमी कळताच अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी बोरी येथे लगेच धाव घेऊन सुभाष सावकार गोंड्रावार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिले.
सुभाष सावकार गोंड्रावार हे सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमी सक्रीय असायचे स्वभाव प्रेमळ व मनमिळाऊ होते. बोरी व पंचक्रोशीत प्रसिद्ध व लोकप्रिय होते त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
गोंड्रावार परिवारात दुःख व आघात झाल्याने दुःखात सामील असल्याचे म्हणत अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी गोंड्रावार परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे, उपसरपंच पराग ओल्लालवार, अखिल कोलपाकवार, अनिल गुरुनूले आदी व अन्य नागरिक उपस्थित होते.
