व्यवसायाचे गणित.. चक्क बकऱ्याना रेनकोट
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

जिवती : सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांना शेतीचे कामे करणे खूप कष्टाचे होत आहे त्यात जनावरांना चरायला घेऊन जाणे. हे खूप कष्टाचे काम होत आहे कारण पावसाच्या काळामध्ये जर बकऱ्या भिजल्या तर त्यांना सर्दी खोकला होऊ नये. त्या बिमार होऊ शकतात म्हणून जिवती तालुक्यातील एका तरुणाने नवीन शक्कल शोधून काढली. आपल्या बकऱ्या पावसात भिजू नयेत. त्यांना सर्दी खोकला होऊ नये. म्हणून त्याने चक्क बकऱ्यांना रेनकोटची व्यवस्था केली. आपल्या पंचवीस बकऱ्यांना त्याने प्लास्टिक कव्हर असलेल्या पोत्यांचा रेनकोट म्हणून वापर केला. त्यामुळे दिवसभर जरी बकऱ्या चरून आल्या तरी त्या भिजत नाहीत. उच्चशिक्षित अशा जिवती तालुक्यातील गुडसेला या गावातील युवक प्रशांत माधव मोरे यांनी आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मागील तीन वर्षापासून बकऱ्याचा व्यवसाय करतात. ते सांगतात की शेतीला पूरक व्यवसाय असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी केवळ कापूस या पिकावर अवलंबून न राहता त्यांनी बकरी पालन सारखे व्यवसाय करावेत कारण कापूस हा 65 रुपये किलो आहे तर बकऱ्याचे मटण हे सातशे ते आठशे रुपये किलो याप्रमाणे आहे म्हणून बेरोजगार युवकांनी या पद्धतीचे व्यवसाय करावेत. जिवती तालुका हा जंगली भाग असल्यामुळे बकरी पालनाच्या व्यवसायाला मोठी संधी आहे. त्यांनी केलेला हा बकरीच्या रेनकोट चा विषय तालुक्यात सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून चर्चेचा विषय झाला आहे.
