Home Breaking News आशिक हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल तथाकथित आरोपी पसार.

आशिक हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल तथाकथित आरोपी पसार.

98

आशिक हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल तथाकथित आरोपी पसार.

सुवर्ण भारत: शंकर महाकाली
चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे आशिक हुसेन यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून या तथाकथित आरोपीवर BNS 299 व BNS 196 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुस्लिम समाजाच्या भावना आशिक हुसेन यांनी अल्लाह विषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडिया फेसबुक पेजवर सार्वजनिकरित्या जशाच्या तसाच पुन्हा प्रकाशित करून केले आहे.

दिनांक 09.07.2025 पोलिस स्टेशन चंद्रपुर शहर येथे आशिक हुसेन यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत ची तक्रार करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की दिनांक 27 जून रोजी अल्लाह विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता ही तक्रार आमिर शेख यांनी मुस्लिम समाजाच्या भावना आहत झाल्या दुखावल्या म्हणून 27/06/2025 रोजी 23/04 मिनिटांनी FIR NO.0498 प्रमाणे दाखल केली होती.
ती आक्षेपार्ह पोस्ट ज्याने पाठवली होती त्याचे मो. क्रमांक 9067764781 असे असून हा मजकूर टाकणाऱ्या मोबाईल धारकांवर 27 जून रोजी पो. स्टें. रामनगर येथे भारतीय न्याय संहिता (बी.एन. एस), 2023 प्रमाणे कलम 196 व कलम 299 प्रमाणे कारवाई करण्यात आली होती.
परंतु जो आक्षेपार्ह मजकूर 9067764781 या मोबाईल धारकांनी पोस्ट केला होता त्याच्या त्याच मजकूर चा स्क्रीन शॉट काढून जशाच्या तसाच तो मजकूर नया भारत खबर संपादक आशिक हुसेन या नावाचे इस्माने प्रसारित केला असून तो स्वतःला संपादक असे उल्लेख केला आहे वास्तविक पाहता तो आक्षेपार्ह मजकूर सार्वजनिक रित्या प्रसारित प्रकाशित करणे हा कायद्याने गुन्हा असतांनाही आशिक हुसेन यांनी हा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर जसाच्या तसाच टाकला. हा आक्षेपार्ह मजकूर त्यांनी व्हॉट्स अँप, फेसबुक सोशल मीडियावर सार्वजनिक रित्या टाकल्याने व तक्रारकर्त्याला व्यक्तिक व्हॉट्स अँप नंबर वर 27 जून च्या रात्रीच टाकल्याने तक्रारकर्त्यांनी माझ्या व मुस्लिम समाजाच्या सुद्धा धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे तक्रारीत म्हटले असून मुस्लिम समाजाच्या अनेक लोकांनी देखील हा आक्षेपार्ह मजकूर आशिक हुसेन यांनी सोशल मिडीया वर टाकल्याने त्यांच्या ही भावना मोठ्या प्रमाणात आहत झाल्या, दुखावल्या गेल्या व त्यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना आशिक हुसेन यांच्यावर कारवाई करावी असे निवेदन दिले आहे.

असे आक्षेपार्ह मजकूर टाकून बातमी प्रकाशित करता येत नाही परंतु जाणून हेतू पुरस्कर बुद्धीने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवण्याचे कृत्य आशिक हुसेन नावाच्या
स्वयंघोषित पत्रकाराने केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जो आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यावर जश्या प्रकारे 299 व 196 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे तोच मजकूर सोशल मिडिया मध्ये पुन्हा जश्याचा तसा सार्वजनिक रित्या आशिक हुसेन यांनी पोस्ट केला आहे त्यामुळे हा आक्षेपार्ह मजकूर अनेक मुस्लिम बांधवापर्यंत पोहोचला. हा आक्षेपार्ह मजकूर पुन्हा जश्याचा तसाचं पोस्ट करणाऱ्या आशिक हुसैन वर ही गुन्हा दाखल करण्यात आला असून आशिक हुसेन पसार झाला आहे. व जिल्हा सत्र न्यायाधीश कडे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, हे मात्र विशेष!

मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या या आशिक हुसेन बद्दल मुस्लिम समाजात रोष निर्माण झाला आहे. जेवढा गुन्हेगार हा आक्षेपार्ह पोस्ट टॉकणारा आहे. त्यापेक्षा ही मोठा गुन्हेगार हा आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडिया च्या माध्यमातून सार्वजनिक रित्या पोस्ट करणारा देखील आहे.असे देखील बोलले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य समजून मुस्लिम बांधवांनी ही तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे.

आशिक हुसेन नावाच्या या इसमाने अनेक लोकांची व्यक्तिक बदनामी उपहासात्मक टिप्पणी अनेक वेळा केली असून या आशिक हुसेन यांच्या विरोधात चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन व रामनगर पोलिस स्टेशन येथे अनेक अदखलपात्र गुन्ह्याची सुद्धा नोंद करण्यात आली असून आशिक हुसेन हा समाज माध्यमात डोकेदुखी ठरत असून अनेकांना मानसिक त्रास होत आहे हे मात्र विशेष!