Home Breaking News • प्रा.जालिंदर चंदनशिव यांना ‘ द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा ‘ राज्यस्तरीय...

• प्रा.जालिंदर चंदनशिव यांना ‘ द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर— • 30 जुलै रोजी पुरस्काराने सन्मानित होणार—

189

प्रा.जालिंदर चंदनशिव यांना ‘ द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर—

• 30 जुलै रोजी पुरस्काराने सन्मानित होणार—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

80 87 17 57 12

आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यरत सहशिक्षक प्रा.जालिंदर चंदनशिव सर यांना ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा’ महाराष्ट्र राज्य 2025 चा राज्यस्तरीय ‘ आदर्श शिक्षक ‘ पुरस्कार जाहीर करण्यात आला .
हा पुरस्कार सामाजिक /शैक्षणिक आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ ‘ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक या पुरस्काराने प्राध्यापक जालिंदर चंदनशिव सर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा 30 जुलै 2025 रोजी 11:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे . तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारावा , अशी विनंती प्राध्यापक जालिंदर चंदनशिव सर यांना पुरस्कार निवडपत्रा मध्ये केली आहे .
प्राध्यापक जालिंदर चंदनशिव सर यांना ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ ‘ महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल , संस्थेचे अध्यक्ष अब्दुल भाई सय्यद , महाविद्यालयातील सहशिक्षक , प्राध्यापक /सामाजिक /शैक्षणिक आदी क्षेत्र व सर्व स्तरातील नागरिक, मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे .