Home Breaking News #Beed Dist • आमदार सुरेश धस यांचा होमिओपॅथिक डॉक्टरांच्या उपोषणाला खंबीर पाठिंबा

#Beed Dist • आमदार सुरेश धस यांचा होमिओपॅथिक डॉक्टरांच्या उपोषणाला खंबीर पाठिंबा

287

#Beed Dist
• आमदार सुरेश धस यांचा होमिओपॅथिक डॉक्टरांच्या उपोषणाला खंबीर पाठिंबा

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
80 87 17 57 12

बीड : आमदार सुरेश धस यांचा होमिओपॅथीक डॉक्टर सीसीएमपी कोर्स पूर्ण झालेल्यांची एम एम सी ला स्वतंत्र रजिस्टर बनवून नोंदणी करावी यासाठी कायदा पारीत झाला असूनही आय एम ए या खाजगी संघटनेच्या विरोधाला लक्षात घेऊन 2006 ला कायदा होऊनही तो का अमलात आणला नाही ? म्हणजे कायदे बनवणाऱ्या सभागृहा पेक्षा आय एम ये मोठी आहे की काय ? असा सवाल आमदार सुरेश धस यांनी विचारला होता. आणि म्हणून होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेचे नेते डॉ. जितीन वंजारे यांनी आवर्जून कॉल करून सुरेश धस साहेबाना बोलावून घेतले त्यांनीही विनंतीला मान देऊन लेगचच उपोषण स्थळी भेट दिली. आणि खंबीर साथ दर्शवली. आ.सुरेश धस साहेबांचे स्वागत अगदी मोठ्या आवाजात टाळ्या वाजवून आणि अण्णा अण्णा म्हणत सर्व डॉक्टरांनी केले. लोकनेता असावा तर असा असे उद्गार यावेळी बोलताना डॉ. जितीन वंजारे यांनी काढले आणि आमदार सुरेश धस यांचे सर्वानुमते आभार मानले .