Home Breaking News #Ballarpur • जनसुरक्षा विधेयक कायदा हा असविधानिक तात्काळ रद्द करा

#Ballarpur • जनसुरक्षा विधेयक कायदा हा असविधानिक तात्काळ रद्द करा

90

#Ballarpur
• जनसुरक्षा विधेयक कायदा हा असविधानिक तात्काळ रद्द करा

सुवर्ण भारत: विशाल डुंबेरे
जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

बल्लारपूर : वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूर तालुका व शहर तर्फे दिनांक 21जुलै 2025 रोजी तहसीलदार यांच्यामार्फत मा. राज्यपाल(म.रा)यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षा विधेयक कायदा पारित केला असून यामुळे शाहू,फुले,आंबेडकर चळवळीला पूर्णपणे नष्ट करण्याच्या षड्यंत्र असून तसेच जनसामान्य लोकांना आपले अधिकार मागता येणार नाही. असा कायदा सरकारने आणला असून या कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन महिला आघाडी तसेच बाळासाहेब आंबेडकर या कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्ट न्यायालयीन लढाई लढणार असून जर हा कायदा त्वरित रद्द न केल्यास येणारा काळामध्ये वंचित बहुजन महिला आघाडी मोठ्या ताकतीने रोडावर येऊन जन आक्रोश आंदोलन उभारणार.

यावेळी सौ.कविताताई गौरकार जिल्हाध्यक्षा महिला आघाडी चंद्रपूर, सत्यभामाताई भाले, जिल्हा ज्येष्ठ सल्लागार, रत्नमाला निरंजने जिल्हा सल्लागार, सुप्रिया चंदनखेडे जिल्हा सचिव, नम्रता साव, तालुका अध्यक्ष बल्लारपूर, सुशीला नगराळे तालुका महासचिव, रेखा पागडे शहराध्यक्ष, मधुकर उराडे जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी, वंदना पुणेकर,सुनिता पुडके, उमेश कडू शहर अध्यक्ष बल्लारपूर ,अभिलाष चूनारकर तालुका अध्यक्ष युवा आघाडी,रिनाताई कांबळे ग्रामशाखा अध्यक्षा,व सर्व जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.