#Chandrapur
• योगनृत्य परीवारच्या वतीने चंद्रपूरात पार पडला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम!
सुवर्ण भारत: किरण घाटे



विदर्भ विशेष प्रतिनीधी
चंद्रपूर : योगनृत्य परीवाराच्या वतीने काल चंद्रपूर शहरातील राजीव गांधी सभागृहात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम थाटात पार पडला.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने दुधाराम भागडे व अन्य वयोवृद्ध मंडळींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.विविध कार्यक्रमात संपन्न झालेल्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला योगनृत्य परीवाराचे संस्थापक गोपाल मुंदडा ,सुरेश घोडके, किशोरी हिरूडकर, प्रशांत कत्तुरवार आशिष झासर ,बाविस्कर,रंजु दिलीप मोडक, पुनम पिसे, आकाश घोडमारे, अशोक पडगिलवार, जितु इजगिलवार, अश्विनी अलगमवार, वैशाली बाविस्कर, सुषमा मुंडाने, छाया हिरोळे, स्रध्दा झाडे, स्नेहा तुपकर, सरिता दुर्गे व शहरातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
