Home Breaking News वरोऱ्यात एका वीस वर्षीय युवकाने चार वर्षीय बालकाशी केले अनैसर्गिक कृत्य ...

वरोऱ्यात एका वीस वर्षीय युवकाने चार वर्षीय बालकाशी केले अनैसर्गिक कृत्य २१ जुलै ला उघडकीस आली घटना पालकाने दिली पोलिसात तक्रार शहरात संतापाची लाट

138

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : शहरातील गांधी सागर तलाव परिसरात एका युवकाने चार वर्षीय बालकाला चॉकलेट चे आमिष दाखवून अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना २१ जुलै २०२५ ला उघडकीस आली. बालकाच्या पालकाचे तक्रारीवरून या प्रकरणी वरोरा पोलिसांनी पास्को कायद्यान्वये युवकावर गुन्हा दाखल केला आहे.सदर आरोपी युवकाचे नाव साहिल तेलंग वय २० वर्ष, रा.बावणे ले आऊट वरोरा असे आहे.आरोपीला २१ जुलैला रात्रीच अटक करण्यात आली

शहरातील गांधी सागर तलाव परिसरात व्यसनाधीन युवकांचा घोळका भटकत असतात. त्यामुळे बालकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.आरोपी युवकाने गांधीसागर तलाव परिसरात २१ जुलै ला संध्याकाळचे सुमारास चार वर्षीय एका बालकाला चॉकलेट चे आमिष दाखवून त्याच्याशी अनैसर्गिक वर्तन केले.पीडित बालक घरी परतला तेव्हा त्याने आपल्या पालकाला घडलेला प्रकार सांगितला.पालकाने तात्काळ वरोरा पोलिसात तक्रार दिली.पोलिसांनी गंभीर बाब लक्षात घेऊन लगेच गुन्हा दाखल केला असून आरोपीविरुद्ध कलम १३७/२ आणि पास्को कायद्यान्वये कलम ४ व६ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे करीत आहे.

सदर घटनेबाबत शहरात संतापाची लाट आरोपीस कडक शिक्षा देण्याची मागणी
—————————-
गांधीसागर तलाव शहराचे मध्यभागी असून शहराचे एक वैभव आहे.तलाव परिसरात व्यसनाधीन लोकांचे टोळके बसले असते.त्यामुळे छोट्या बालकांना भीती निर्माण झाली आहे.घडलेली घटना ही निर्दयी व क्रूर असून शहरात संपूर्णतः संतापाची लाट उसळली आहे.स्थानिक नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते आणि बालहक्क संरक्षण समित्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे.आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी.अशी मागणी होत आहे.

बालकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर
—————————+-
सदर घटनेमुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणे बालकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.पोलीस विभागाने अशा घटना घडू नये यासाठी आपली गस्त अधिक वाढवावी अशी अपेक्षा शहरवासीय करीत आहे.