Home Breaking News #Ghugus घुग्घुस पोलिसांकडून प्रामाणिक नागरिकाचा सत्कार:* *हरवलेले पाकीट आणि महत्त्वाची कागदपत्रे...

#Ghugus घुग्घुस पोलिसांकडून प्रामाणिक नागरिकाचा सत्कार:* *हरवलेले पाकीट आणि महत्त्वाची कागदपत्रे मूळ मालकाला परत

64

#Ghugus
घुग्घुस पोलिसांकडून प्रामाणिक नागरिकाचा सत्कार:

हरवलेले पाकीट आणि महत्त्वाची कागदपत्रे मूळ मालकाला परत

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

 

घुग्घुस : येथील नागरिक दिलीप इंगोले यांचे दिनांक २३ जुलै,२०२५ बुधवार रोजी पैशांचे पाकीट आणि त्यातील महत्त्वाची कागदपत्रे हरवली होती. सुदैवाने, हे हरवलेले पाकीट आणि दस्तऐवज घुग्घुस येथीलच रहिवासी विनोद सदाशिव कामतवार यांना सापडले.
कामतवार यांनी तातडीने हे पाकीट आणि त्यातील कागदपत्रे घुग्घुस पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी केलेल्या पडताळणीनंतर, ही सर्व वस्तू दिलीप इंगोले यांच्या असल्याचे निष्पन्न झाले आणि ती त्यांना सुखरूप परत करण्यात आली.
या प्रामाणिक कृत्याबद्दल घुग्घुस पोलीस ठाण्याच्या वतीने श्री. विनोद सदाशिव कामतवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी कामतवार यांच्या सचोटीचे आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेचे कौतुक केले. या घटनेमुळे समाजात प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा अजूनही टिकून असल्याची भावना व्यक्त होत आहे. दिलीप इंगोले यांनीही कामतवार आणि घुग्घुस पोलिसांचे आभार मानले.