Home Breaking News #Ghugus भारतीय मजदूर संघच्या ७१ वा स्थापना दिवस उत्साहात बनविला

#Ghugus भारतीय मजदूर संघच्या ७१ वा स्थापना दिवस उत्साहात बनविला

132

#Ghugus
भारतीय मजदूर संघच्या ७१ वा स्थापना दिवस उत्साहात बनविला

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

#घुग्घुस : भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघ कार्यालयात ” “२३ जुलै भारतीय मजदूर संघ ७१ वा स्थापना दिवस” मोठ्या उत्साहात कार्यक्रम करण्यात आला.

सर्वप्रथम भगवान विश्वकर्मा,भारत माता,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दंत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच दिपजव्लीत करुण सामुहिक भारतीय मजदूर संघाचे गायण करण्यात आले.
भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघाचे अध्यक्ष विवेक अल्लेवारी म्हणाले की,आज २३ जुलै हि आपली भारतीय मजदूर संघाची स्थापना दिवस आहे तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंतीनिमित्त त्याच्या प्रतिमेस अभिवादन करतो.

अध्यक्ष विवेक अल्लेवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त करीत सांगितले की,दरवर्षी 23 जुलै रोजी बीएमएस स्थापना दिवस म्हणजेच भारतीय मजदूर संघ स्थापना साजरा केला जातो. भारतीय मजदूर संघ (बीएमएस) ची स्थापना २३ जुलै १९५५ रोजी दंत्तोपंत ठेंगडी जी यांनी केली. ही भारतातील सर्वात मोठी कामगार संस्था मानली जाते, जी कामगारांच्या हक्क आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी सतत कार्य करते. बीएमएसचा उद्देश कामगार संघटित करणे आणि त्यांना योग्य पगार, सुरक्षित कामाचे वातावरण आणि आदरणीय जीवन देणे आहे.
देशभरात बीएमएस स्थापना दिवसेंदिवस वर देशभरात रॅली, सेमिनार आणि जागरूकता मोहिम आयोजित केली जातात. कामगारांच्या हितसंबंधांशी संबंधित मुद्द्यांविषयी चर्चा केली जाते आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी योजना तयार केल्या जातात. हा दिवस आम्हाला कामगारांच्या योगदानाचा आणि त्यांच्या मेहनतीचा आदर करण्यास प्रेरित करतो. बीएमएस अजूनही देशाच्या प्रत्येक कोन्याकोपर्यात कामगारांच्या आवाजाच्या रूपात काम करत आहे.
महामंत्री प्रशांत कौरासे यानेही आपले मनोगत व्यक्त करीत जेष्ठ,नवनियुक्त पदाधिकारीने आपले मनोगत व्यक्त करण्यात आले.
७१ वा स्थापना दिवस उत्साहात कार्यक्रम पार पडताना मिठाई वितरण करण्यात आले.

याप्रसंगी भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघाचे पदाधिकारी व कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.