Home Breaking News विज पीडित कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्या-सुदाम राठोड

विज पीडित कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्या-सुदाम राठोड

354

विज पीडित कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्या-सुदाम राठोड

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

जिवती : दि. 21 जुलै 2025 रोज सोमवारला दुपारी 03:00 वाजताच्या सुमारास चिखली येथील शेतकरी रमेश रामू जाधव यांचा विज पडून शेतामध्येच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात तीन मुली व आई – वडील आहे त्याच्या कुटुंबियांची आर्थिक बाजू खूप कमजोर आहे त्यांना आधार देण्याची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी तहसीलदार जिवती यांना निवेदन देऊन रमेश जाधव यांच्या पीडित कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी विनंती केली व त्याच दिवशी शेतामध्ये फवारणी करण्यासाठी गेले असताना दुपारच्या वेळेस विज पडून टेकाअर्जुनी येथील अक्षय रामदास मुगावे, गणेश सुभाष वारे व धोंडामांडवा येथील शिवकुमार रामसिंग तांबूळे हे तिन्ही शेतकरी विजेच्या झटक्याने गंभीर जखमी झाले असून यांना सुद्धा शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. निवेदन देताना उपस्थित शेतकरी संघटनेचे जिवती तालुकाध्यक्ष सुदाम राठोड, देविदास वारे, विशाल राठोड व शेतकरी बांधव उपस्थित होते.