• नागभीड नागपूर हायवे कुनघाळा चक येथे इथे रस्ता रोको आंदोलन
• नागभीड नागपूर हायवे दोन तासासाठी बंद करण्यात आले होते
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.
नागभीड -दिनांक24/07/2025 ला शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्याच्या सात /बारा कोरा करावा त्यासह कर्जमाफी करण्यात यावी. या सह अनेक मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पार्टी नागभीड मोहाडी चक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात सहभागी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात शेतकरी मच्छीमार मेंढपाळ आणि घरेलू कामगार दिव्यांग बांधव सहभागी झाले.
शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी नागभीड तालुक्याचे तालुकाप्रमुख वृषभ भाऊ खापर्डे यांच्या नेतृत्वाखाली नागभीड नागपूर राष्ट्रीय हायवे दोन तासासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले सकाळपासून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मोहाळी कुनघाडा चक येथे रास्ता रोखून धरला यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकाशी चर्चा केली त्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आले आंदोलनात आमचे शेतकरी आणि युवा वर्ग प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वृषभ खापर्डे, तालुका उपाध्यक्ष सुधाकर मेंडुलकर, युवा तालुकाप्रमुख पप्पू देशमुख, शाखा अध्यक्ष हिवक डडमल, शाखा उपाध्यक्ष अरविंद खेडेकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष नागेश कावळे, नागपुर तालुक्याचे प्रवक्ते देवानंद गायधने, मांगली शाखा उपप्रमुख भुपेश देशमुख, मागंली शाखाप्रमुख संदीप देशमुख, नवखळा शाखाप्रमुख गौरव जाभुळे, अतुल खेडेकर, नागभीड शहर प्रमुख नानक नाकाडे, नागभीड तालुका संघटक संतोष जीवतोडे, आणि इतर सर्व पद अधिकारी प्रहारसेवक उपस्थित होते.


