Home Breaking News डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस तर्फे आदरांजली...

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

90

• डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घूस : देशाचे 11वे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त घुग्घूस शहर काँग्रेस कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र आदरांजली अर्पित केली.

काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी कलाम साहेबांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की देशाला कलाम साहेबांनी महत्वपूर्ण योगदान दिले असून भारताला मिसाईल सारखे महत्वपूर्ण शस्त्र दिले
कलाम यांनी देशाच्या सरक्षण संशोधन आणी विकास संस्थेत (DRDO ) आणी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO ) मध्ये महत्वपूर्ण कार्य केले.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, सुनील पाटील, निखिल पुनघंटी,कुमार रुद्रारप, दिपक कांबळे, कपिल गोगला, आयुष आवळे,अंकुश सपाटे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते