Home Breaking News आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाआरोग्य’ शिबिराच्या नियोजनाची बैठक नागरीकांनी महाआरोग्य...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाआरोग्य’ शिबिराच्या नियोजनाची बैठक नागरीकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा: विवेक बोढे

146

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाआरोग्य’ शिबिराच्या नियोजनाची बैठक

नागरीकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा: विवेक बोढे

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस: आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात लाडकी बहीण समितीच्या महिलांची शनिवार, २६ जुलै रोजी भव्य महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक पार पडली.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुसचे भूमिपुत्र तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन ३० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रयास सभागृहात करण्यात आले आहे.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, यांनी उपस्थित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नियोजनाच्या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच नागरीकांनी भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले.

यावेळी भाजपाचे निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा,विवेक (गुड्डु) तिवारी, सिनू इसारप, महेश लठ्ठा ,गणेश कुटेमाटे, सुनील बाम, प्रमोद भोस्कर, बबलू सातपुते, रत्नेश सिंग, इर्शाद कुरेशी, तुलसीदास ढवस, मिलिंद पानघाटे, हसन शेख, सतीश बोन्डे, सुरेंद्र भोंगळे, हेमंत पाझारे, श्रीकांत सावे, सुरेंद्र जोगी, योगेश घोडके, योगेश होकम, सुशील डांगे, गंधर्व भगत, ललित होकम, शंकर सिद्दम, गोपाल तोटा,अनंता कपारे, प्रवेश सोदारी, भारत साळवे, अतुल चोखांद्रे, विक्की निभ्रड, गणेश राजुरकर, विक्की सारसर,अनुपम जोगी, रवी चुने, गौरव ठाकरे, सुनील राम, विनोद जंजर्ला,शुभ सोदारी, सिनू कोत्तूर, राकेश चिंताला,रोहित जैस्वाल,अमीना बेगम व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.