Home Breaking News #Chandrapur • चंद्रपूर रेल्वे स्थानक येथून जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस विश्व्...

#Chandrapur • चंद्रपूर रेल्वे स्थानक येथून जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस विश्व् मानव दुरव्यापार विरोधी दिनाच्या साप्ताहची सुरवात

76

#Chandrapur
• चंद्रपूर रेल्वे स्थानक येथून जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस विश्व् मानव दुरव्यापार विरोधी दिनाच्या साप्ताहची सुरवात

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

चंद्रपूर : विश्व मानवी दुर्व्यापार विरोधी दिवसाचे अवचित्याने भारतभर सेंट्रल रेल्वे रेल्वे पोलीस बल. असेस टू जस्टीस फॉर चिल्ड्रन प्रकल्प जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्प यांच्या सहयोगातून भारतभर सर्व रेल्वे स्थानकांवर मानवी तस्करी विरुद्ध जागतिक दिनाचे कार्यक्रमाचा सप्ताह चालवण्याचे ठरले त्या अनुषंगाने चंद्रपूर येथील हृदय संस्थेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्टेशन प्रबंधक अयान खान , बालकल्याण समिती अध्यक्ष क्षमा बासरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, जीआरपी रेल्वे पीएसआय नितीन अस्वरमल, सर्व ड्युटी कर्मचारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, या अभियानाची सुरुवात आलेल्या मान्यवरांच्या स्वाक्षरीने स्वाक्षरी अभियानाने करण्यात आली, याप्रसंगी रेल्वेतून उतरणाऱ्या चढणाऱ्या प्रवाशांना क्षेत्रीय अधिकारी श्री शशिकांत मोकाशे यांचे माध्यमातून मानवी तस्करी कशा प्रकारे होते याची माहिती, टोल फ्री नंबर काय असतात जर आपल्याला प्रवासाचे दरम्यान असाह्य अवस्थेत बालक सापडला तर त्याची काळजीच्या सौरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण कुठे सूचित करायचे जेणेकरून तो बालक आपल्या घरापर्यंत सुखरूप पोहोचू शकला पाहिजे अन्यथा चुकीच्या लोकांच्या हातात जर तो बालक लागला तर त्याचे अवयव कापून त्यापासून भीक मागणी यासारखे किंवा त्याची विक्री करून लेबर कामासाठी वापरल्या जाऊ शकते तो लैंगिक शिकार सुद्धा होऊ शकतो अशा प्रकारच्या तस्करीवर नियंत्रण कसे करता येईल आणि नुसते हे याची जबाबदारी प्रशासन करेल असे बोलले तर ते चुकीचे ठरेल प्रशासन आपली जबाबदारी पार पाडतच आहे परंतु तर जनसामान्यांच्या सहकार्याने या देशाचा सज्जन नागरिक म्हणून हा प्रतिबंधनाचा प्रकार घडवून येऊ शकतो. याबद्दल जनसामान्यांना मार्गदर्शन करण्यात आले व रेल्वे प्रशासनाने लावलेल्या सूचना प्रणालीत याबद्दलची टोल फ्री जाहिरात सुद्धा करण्यात आली. प्रवाशांना या संदर्भातील पोस्टर हॅन्डविल वाटप करून सर्व टीमने आपल्या आपले स्तरावर रेल्वे डब्या जवळ जाऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी हृदय संस्थेच्या टिम च्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक प्रिया कांबळे, क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे, समुपदेशिका राणी मेश्राम क्षेत्रीय अधिकारी सोनम लाडे क्षेत्रीय अधिकारी लक्ष्मी भोयर रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी यांच्या अथक प्रयत्नातून सदरचा कार्यक्रम घेण्यात आला .