किशोर नवले कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी व एक उत्कृष्ट चित्रकार!
चंद्रपूर – किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यात महसूल विभागात जे काही उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱे मंडळ अधिकारी आहेत. त्यात किशोर नवले यांची एक कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी म्हणून शेतकरी बांधवांत व महसूल खात्यात ओळख आहे.
सध्या नवले हे बल्लारपूर तालुक्यात मंडळ अधिकारी या पदावर गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहेत.या पूर्वी त्यांनी घूग्गूसचे मंडळ अधिकारी म्हणून पाच ते सहा वर्षे जबाबदारी सांभाळली.सर्व सामान्य जनतेसह त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध आज पर्यंत जोपासले आहे .जनतेची कामे वेळीच हातावेगळी करण्यात त्यांचा हातखंडा आहे.चंद्रपूर तालुक्यात कार्यरत असताना त्यांना महसूल विभागाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी मुरगानथम यांच्या प्रमुख उपस्थितीत एक सर्वोत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून गौरविण्यात आले होते.ही त्यांच्या उल्लेखनीय कामाची एक पावतीच आहे.
शालेय जीवनापासूनच त्यांना चित्रकलेची अमाप आवड आहे.त्यांनी आपल्या कुंचल्यातून राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व फिल्म जगत मधील अनेकांची छायाचित्रे उत्तम व सुरेखरित्या रेखाटली आहेत.ब-याच जणांनी चित्रकार किशोर नवले यांच्या कलेला दाद दिली आहे.पटवारी संघटनेचे आधारस्तंभ व झुंजार नेते दिवंगत वि.म.उजवणे यांचेही छायाचित्र चित्र त्यांनी आपल्या कलेतून या पूर्वी सुंदररित्या व हुबेहूब रेखाटले आहे.एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून त्यांची अख्ख्या विदर्भात ख्याती आहे.
