Home Breaking News घुग्घुस शहरातील कासव गतीने पुलाचे बांधकाम चालु असल्याने व वाहतूक पोलीस नसल्याने...

घुग्घुस शहरातील कासव गतीने पुलाचे बांधकाम चालु असल्याने व वाहतूक पोलीस नसल्याने जोरदार अपघात ! लक्ष केंद्रित केव्हा झाले अपघात झाल्यावर न ट्राफिक सिंग्नल चालु का बर ..? वाहतूक पोलीसानी का केले?

254

• घुग्घुस शहरातील कासव गतीने पुलाचे बांधकाम चालु असल्याने व वाहतूक पोलीस नसल्याने जोरदार अपघात !

• लक्ष केंद्रित केव्हा झाले अपघात झाल्यावर न ट्राफिक सिंग्नल चालु का बर ..?

वाहतूक पोलीसानी का केले?

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस येथील वणी रोडवरचे पुलाचे बांधकाम कासव गतीने चालु आहे,वेळोवेळी राजकीय पक्षाचे नेते निवेदन देत असतात व थातूरमातूर आंदोलन करण्यात येते,काही स्वताला सामाजिक कार्यकर्ता म्हणून फेसबुक लाॅयु विडिओ बनवितात तर काही सामाजिक नेते मंत्र्याला निवेदन देत असतात काम झाल सर्वच मीच केले म्हणतात. वर्षानुवर्ष कासव गतीने पुलाचे काम चालु आहे. आणि अनेकदा नेते थातूरमातूर आंदोलन करण्यात येतात, पण काहीच होत नाही, अनेक अपघात होत राहतात.
पण दि.३० जुलै बुधवार रोजी रात्री अंदाजे ०९:२० वाजता ट्रक क्रमांक टी.जी.२९ टी.२९६९ छत्रपती शिवाजी चौक परिसरात जोरदार दुचाकी वाहनला जोरदार धडक दिली.दुचाकी वाहनावर दोन वेकोलिचे कर्मचारी होते.धडक एवडी जोरदार होती की,दोघाचे पायाचे चेंदाबेदा झाला. ते वेकोली कैलाश नगर काॅलनीचे रहवासी होते.
सूत्रानुसार अनेकदा वाहतूक पोलीसांची नियुक्ती करण्याची निवेदन देण्यात आले.
तरीपण अनेकदा छोटे,मोठे अपघात होत असतात.आणि थातूरमातूर काही दिवस वाहतूक पोलीस असते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिंग्नल असल्यामुळे बरेच महिन्यापासून सिंग्नल नियमितपणे सुरू नसुन तेथुनत दिवसातुन १० ते १२ वेळा वाहतूक पोलीस गाडीने चक्रा मारत राहतात,पुलाचे कासव गतीने काम चालु आहे न अंदाजे वीस वेळा रेल्वे गेट बंद करण्यात येतात, आणि जडवाहतूक व छोटे,मोठे वाहतूकीने रस्ता जाम होतात.तसेच नागरिकांना खुपच त्रास सहन करावा लागतो.

राजकीय,अनेक पक्ष नेते थातूरमातूर आंदोलन करतात व निवेदन देत असतात.सत्ताधारी व बिनसत्ताधारी दोघेही थातूरमातूर कामे करीत नागरिकात चांगली, वारंवार चर्चा करण्यात येत आहे.