Home Breaking News बल्लारपूर कारवाची घटना- वनरक्षकने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार – आरोपी फरार पोलिस...

बल्लारपूर कारवाची घटना- वनरक्षकने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार – आरोपी फरार पोलिस आरोपीच्या शोधात !

435

बल्लारपूर कारवाची घटना- वनरक्षकने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार – आरोपी फरार
पोलिस आरोपीच्या शोधात !

बल्लारपूर करवा गावात दि. ५ऑगस्टला अल्पवयीन मुलीवर वनरक्षकाकडून अत्याचार करण्याची घटना घडली आहे. आरोपी वनरक्षक सध्या फरार असल्याचे कळते.

हाती आलेल्या माहितीनुसार, कळते कि पीडित अल्पवयीन मुलगी कॉलेज सुटल्यानंतर मित्रासोबत चंद्रपूरहून गावाकडे जात होती. रस्त्यात त्यांची दुचाकी बंद पडल्याने दोघेही ती दुरुस्त करत असताना एक वनरक्षक चंद्रपूरहून कारवा येथे जात असताना त्यांनी आपली गाडी त्यांच्या जवळ थांबवली .

त्याने मुलीच्या मित्राला धमकी दिली तुझ्यावर खोट्या केस करतो. असे म्हणत पैश्याची मागणी केली.

अल्पवयीन मुलीला म्हणाला तुला पुढच्या गावापर्यंत सोडतो असे सांगून चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली. नंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.

पीडित मुलीने ही माहिती आपल्या मित्राला दिली. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला आणि आपल्या पालकासमवेत बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीसांनी आरोपी वनरक्षकाविरुद्ध अप.क्र. ५९२/२५ नुसार भादंवि कलम ३०८(२), १३७(२), ६४(१), ६५(१) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे.

सदरहु प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, पोहवा यशवंत कुमरे, मपोअं खडसे हे करीत आहेत. ही घटना अत्यंत संतापजनक असून आरोपीस लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.