पूर्वा धोटेंचा वाढदिवस – अनेकांनी दिल्या शुभेच्छा!
चंद्रपूर : प्रियंका गायकवाड
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूराच्या जेष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे यांची लाडकी कन्या पूर्वा धोटे हिचा आज वाढदिवस असून अनेकांनी तिला वाढदिवसाच्या निमित्ताने भ्रमनध्वनीवरुन व व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
दरम्यान सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका- योगशिक्षिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे व भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी व राजूरा येथील सुनील रामटेके व त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांनी पूर्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
पूर्वा ही सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून वेळोवेळी तिला तिच्या आजीचे मार्गदर्शन लाभत आहे.
