Home Breaking News • तैलिक महासभा युवा जिल्हाध्यक्ष आशीष देवतळे तर उमेश कुंडले बल्लारपूर शहरअध्यक्ष...

• तैलिक महासभा युवा जिल्हाध्यक्ष आशीष देवतळे तर उमेश कुंडले बल्लारपूर शहरअध्यक्ष पदावर नियुक्ती

128

• तैलिक महासभा युवा जिल्हाध्यक्ष आशीष देवतळे तर उमेश कुंडले बल्लारपूर शहरअध्यक्ष पदावर नियुक्ती

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा चंद्रपूरची महत्वपूर्ण आढाव बैठक जोड देऊळ मंदिर पठाणपुरा चंद्रपूर येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष माजी खासदार रामदास तडस प्रदेश महासचिव भूषण कर्डिले,प्रदेश कोषाध्यक्ष गजानन शेलार, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आशिष देवतळे यांना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तर उमेश कुंडले बल्लारपूर शहर अध्यक्ष तर दिनेश लिचोडे शहर कार्यध्यक्ष व सचिन येनूरकर शहर उपाध्यक्ष विकास शेंडे शहर सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली..

याप्रसंगी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अतुल वांदिले, उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष पोपटराव गवळी, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, जिल्हाध्यक्ष अजय वैरागडे, विभागीय कार्याध्यक्ष महिला आघाडी सौ.छबुताई वैरागडे, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी आशिष  देवतळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी  श्रुती घटे, शहराध्यक्ष चंद्रपूर राहुल क्षीरसागर, शहराध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर कल्पना बगुलकर ज्येष्ठ समाजसेवक बबनराव फंड, विनायक  बांगडे, बावणे यांची उपस्थिती होती. सोबतच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा कार्यकारणीत तसेच तालुका व शहर कार्यकारणीत कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी जिल्ह्यातून मोठ्या संख्येत तेली समाज बंधू-भगिनींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.