Home Breaking News … अन् चंद्रपूरच्या कुणाल नितीन फुलझेलेने जळत्या कार मधून त्या परिवाराला सहीसलामत...

… अन् चंद्रपूरच्या कुणाल नितीन फुलझेलेने जळत्या कार मधून त्या परिवाराला सहीसलामत बाहेर काढले! • तो ठरला त्या कुटुंबांसाठी देवदूत !

109

… अन् चंद्रपूरच्या कुणाल नितीन फुलझेलेने जळत्या कार मधून त्या परिवाराला सहीसलामत बाहेर काढले!

• तो ठरला त्या कुटुंबांसाठी देवदूत !

सुवर्ण भारत:ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर प्रतिनीधी

चिमूर:सोमवारला पुणे येथील हिजेवाडी फे 3 रोडवर अचानक एका कारला आग लागली .रोडवरून जाणाऱ्या कुणाला ते दृष्य दिसलं !
कुणालने कुठलाही वेळ न गमवता गाडी कडे लगेच धाव घेतली व गाडी मध्ये असणाऱ्या परिवाराला सुखरूप बाहेर काढले.
मुळचा कुणाल हा चंद्रपूर येथील रहिवाशी आहे .
पुणे येथे काँगझान्ट मल्टिनॅशनल कंपनी मध्ये साॅफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे .
कुणालचे वडील नितीन फुलझेले हे चिमूर पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे बालपणापासून वडिलांची शिकवण हेच की दुसऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जावं!
याचीच आठवण ठेवत कुणाल यांनी एका परिवाराला जळत्या कार मधून सहीसलामत बाहेर काढले.स्
वतःच्या जीवाची पर्वा न करता कुणालनी ही कामगिरी बजावली .
यात कुणालला किरकोळ दुखापत पण झाली! म्हणतात ना देव वाचवी त्याला कोण मारी!
कुणाल त्या परिवारा करिता ऐनवेळी एक देवदुतच ठरला !
कारमध्ये परिवारातील एक 3 वर्षाची चिमुकली व तिचे आई वडीलांना कुणालने जळत्या कार मधून बाहेर काढले .पोलिसांना या घटनेची माहिती दिली .नंतर ही आग विझवण्यात आली!
कुणाल फुलझेलेचे सर्वत्र कौतुक होत असून कुणालच्या या कार्याला दैनिक सुवर्ण भारतच सलाम!