कोरपना तालुक्यातील कृषी केंद्रांची झडती
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपना – शेतकऱ्यांना खतांचा योग्य पुरवठा व्हावा तसेच योग्य भावात खते मिळावी. यासाठी कोरपना तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी मोहीम तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका गुण नियंत्रक निरीक्षक मिलिंद ढोणे यांचे नेतृत्वात राबवण्यात येत आहे. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कोरपना हा कृषी प्रधान तालुका ओळखला जातो. या तालुक्यात ८० च्यावर कृषी केंद्रे आहे. येथून शेतकऱ्यांना खतांचे व कृषीमालांचे योग्य वितरण व्हावे. यासाठी ही धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. याद्वारे वन टू वन कृषी केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेत ज्या कृषी केंद्रांची तफावत आढळून आली. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. ज्या कृषी केंद्राने आवश्यक पूर्तता केली नाही. त्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस वरिष्ठ पातळीवर केली जाणार आहे. कोरपना तालुक्यातील आज गायत पर्यंत कुठलीही शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाली नसली तरी कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आता पावेतो ३० हून अधिक कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबवण्यात आली.
