रक्षाबंधन निमित्त विशेष लेख
🟡🔘नारळी पौर्णिमा रक्षाबंधन!
सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी 
नारळी पौर्णिमा म्हणून निसर्गचक्राचा समतोल राखण्यासाठी कोळी बांधव आजच्या दिवशी आपल्या मासेमारीपासून दूर असतात. आजचा सण त्यांच्यासाठी आनंदाचे उधानच. आजच्या दिवशी पावसाच्या जोरात खवळलेला समुद्र शांत होतो अशी आख्यायिका आहे. कोळी बांधव आपल्या होड्या पूजन करून समुद्रात उतरवून मासेमारीला प्रारंभ करतात. यापुढील प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून समुद्र देवाचे पूजन करतात. त्याला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात. त्यांच्या घरी गोडधोड मेजवानी करून सायंकाळी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा, नऊवारी साडी नेसून दागिन्यांनी मढून ठेका धरून गायन नृत्य करतात….
तसेच आजच्या दिवशी आपला संयम व संस्कार कायम ठेवून आजच्या दिवसाची सुरवात करतांना कालचे जे वाईट असेल ते विसरून जाऊन आज काही उत्कृष्ट संस्कारी करून भावा बहिणीचे नाते जन्मोजन्मी टिकवावे.बहीण भावाला राखी बांधून भावाच्या दीर्घआयुष्याची देवाजवळ मागणी करते. तो रक्षा धागा परमकृपाळू असते.. राजा बलीला बांधण्यात आला होता तो पवित्र धागा मी भावाला बांधून सदैव संकटातून रक्षण व्हावे हिच प्रार्थना करते.. राखी सुती असो वा रेशमी ती नेहमीच एकमेकांच्या रक्षणासाठी स्नेहभाव आजन्म जपण्यासाठी कटीबद्धतेचे प्रतीक असते. राखी ही गुरुशिष्यात तसेच स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या जवानांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी बांधतात..
आजचा मान बहिणीचा ती लहान असो वा मोठी सख्खी असो वा मानलेली गरीब असो वा श्रीमंत बहीण बहीणच असते ती आजन्म भावावर निःस्वार्थ प्रेम करते. या प्रेमानेच कौटुंबिक जीवनाची पूर्तता होते!!
घरातील लाडकी लेक उंबरा ओलांडून सासरी जाते तेव्हा माता पित्याची ही खात्री असते की आपल्या पश्चातही तिचा भाऊ जन्मभर तिची पाठराखण करेल., या बहीण भावाच्या विश्वासाचे स्वयंस्फुर्त बंधनाचे प्रतीक म्हणजे राखी!!!
जीवनात प्रसंग कसाही येवो, भाऊ बहीण एकमेकांच्या पाठीशी नक्कीच उभे राहणार ही दोघांनाही खात्री असते. बहिणीला भावविषयी असलेल्या आस्थेने ती राखी बांधते.
आज हा सण शाळाशाळेत तसेच सैनिकांना सुद्धा राखी बांधायला बहिणी तत्पर असतात….
असा हा नारळीपौर्णिमा रक्षाबंधन सण!!!!
🟥सौ. शैला चिमड्यालवार
सहज सुचलं मार्गदर्शिका
सावली- जिल्हा चंद्रपूर
