Home Breaking News • बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण :आ. सुधीर मुनगंटीवार ...

• बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण :आ. सुधीर मुनगंटीवार • बल्लारपूर नगरीत भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन अनेकांची उपस्थिती!

236

• बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण :आ. सुधीर मुनगंटीवार

• बल्लारपूर नगरीत भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन अनेकांची उपस्थिती!

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर : नाट्य सभागृह, बल्लारपूर येथे भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राखी पौर्णिमेच्या पावन दिवशी महिला बूथ समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

शहरातील १५०० ते २००० बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून प्रेम व आशीर्वाद व्यक्त केला. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आ. मुनगंटीवार म्हणाले, रक्षाबंधन ही फक्त राखी बांधण्याची परंपरा नसून ती बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि अनंत आठवणींची गाठ आहे.

या पवित्र क्षणी बहिणी जणू जीवनभराचा आशीर्वाद देतात. लहानपणापासून आजपर्यंतचा प्रवास या एका धाग्यात गुंफलेला आहे. माझ्या बहिणींचं प्रेम हीच माझी ताकद असून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी बहिणींच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षणासाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी कार्यरत राहीन.

कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, भाजपा बल्लारपूर शहर अध्यक्ष व महिला-पुरुष बूथ सशक्तीकरण प्रमुख  रणंजय सिंह, माजी शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, शिवचंद द्विवेदी, समीर केणे,महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी, रेनुका दुधे, ज्योती वेलकेवार, आरती अक्केवार, कांता ढोके, सारिका कनकम, जयश्री मोहुर्ले, सुवर्णा भटारकर, पूनम मोडक, संध्या मिश्रा, बेबी केशकर, डॉ. सुरेखा श्रीवास्तव, श्रावंती इसामपाली, दीपमाला यादव, गुलशन खान, नजमा खान, उत्तरा सोनटक्के, शालू कुमरे सैयदा, उन्नती टेकाडे, सुनीता निवळकर, रेखा चंदाले, गीता गोंडे, प्रज्ञा शेंडे, वनिता चक्रवर्ती, कुंती कश्यप, सोशल मीडिया प्रमुख प्रियंका शेंडे यांच्यासह महिला बूथ समिती सदस्य उपस्थित होते.

सोहळा यशस्वी करण्यासाठी देवा वाटकर, सतीश कनकम, घनश्याम बुरडकर, नगरसेवक येल्ला दसराफ, किशोर मोहुर्ले, महेंद्र ढोके, प्रभदीप सचदेवा, नफीस अन्सारी, सरोज सिंह, बबलू गुप्ता, अजहर शेख, मिथिलेश खेंगर, अरविंद वर्मा, अजय खोबरागडे, सर्वेश मिश्रा, फर्दीन खान, उमेश शाह, राजेश शाह, करण डोंगरे, श्रीकांत पेरका तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले