#Ghugus
• जागतिक आदिवासी दिनानिमित्त शीतपेयाचे वाटप
• सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचा उपक्रम

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
#घुग्घुस: शहरातील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली शीतपेयाचे वाटप करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले तसेच शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव विनोद चौधरी, इर्शाद कुरेशी, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, नितीन काळे, स्वप्नील इंगोले, असगर खान, हेमंत कुमार, गणेश राजुरकर आदी उपस्थित होते.
