Home Breaking News #Chandrapur • जनसुरक्षा विधेयक विरोधात चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन!

#Chandrapur • जनसुरक्षा विधेयक विरोधात चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन!

112

#Chandrapur

जनसुरक्षा विधेयक विरोधात चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन!

चंद्रपूर : किरण घाटे

येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवारी सकाळी ११वाजेपासून तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जनसुरक्षा विधेयक विरोधात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.या
आंदोलनात कामगार, साहित्यिक, कलाकार , सामाजिक संघटना व
नागरिक मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते.
जोरदार घोषणाबाजीने हा परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.सदरहु आंदोलनात जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीचे काॅम्रेड रविंद्र उमाठे ,प्राध्यापक रमेशचंद्र दहीवडे, प्रकाश रेड्डी,डॉक्टर अभिलाषा गावतूरे, मल्लेश कमटम ,श्रीनिवास रेड्डी नामदेव कन्नाके, किशोर पोतनवार अधिवक्ता अशोक तुमराम, तनूजा रायपूरे,
सविता गटलेवार ,किरण धोंगडे यांच्यासह कृती समितीचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.