Home Breaking News मंडल यात्रेचे चंद्रपूरात भव्य स्वागत!

मंडल यात्रेचे चंद्रपूरात भव्य स्वागत!

88

मंडल यात्रेचे चंद्रपूरात भव्य स्वागत!

चंद्रपूर : किरण घाटे

चंद्रपूर : येथील स्थानिक गांधी चौकातील मनपा कार्यालयाच्या परिसरात काल सोमवारी दुपारी मंडल यात्रेचे आगमन झाले.तेव्हा मंडल यात्रेचे व महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेलचे
प्रदेशाध्यक्ष राज राजपूरकर यांचे वाटेत अनेक सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले.दरम्यान याच निमित्ताने आयोजित एका सभेत राज राजपूरकर यांनी उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या शहर जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके यांनी आपल्या सविस्तर भाषणातून चंद्रपूर मनपाच्या आयुक्तांवर जोरदार टीकास्त्र सोडले.या आयोजित सभेत जेष्ठ समाजसेवक
बबनराव फंड, जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार व अन्य काही मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जेष्ठ पदाधिकारी राजेंद्र वैद्य व अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.