• सुधाकर अडबाले सर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
• रवि शिंदे,अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर यांनी दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा
सुवर्ण भारत : मनोज मोडक
प्रतिनिधी, चंद्रपूर
भद्रावती : सहकार क्षेत्राचे अभ्यासक, शिक्षक चळवळीचे मार्गदर्शक, अपक्ष आमदार आणि सर्वांचे शिक्षक नेते सुधाकर अडबाले सर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सुसंस्कारित, स्नेहपूर्ण आणि उत्साही वातावरणात करण्यात आले.
या खास प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक बांधव आणि विद्यार्थी यांनी सरांना प्रत्यक्ष भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अडबाले सरांच्या शिक्षण, सहकार व सामाजिक कार्यातील मोलाच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी भरभरून गौरव केला. त्यांच्या कार्यातून अनेकांना दिशा मिळाल्याचा आणि नव्या शिक्षणदृष्टीकोनाची प्रेरणा लाभल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांनी सरांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. “आगामी काळातही सरांचे मार्गदर्शन लाभो,” अशी सामूहिक अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
या अभिष्टचिंतन सोहळ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवि शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावून अडबाले सरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सरांचा आदर्श समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
