Home Breaking News • आम आदमी पार्टीची मागणी • स्मार्ट प्रीपेड मीटरची चौकशी व...

• आम आदमी पार्टीची मागणी • स्मार्ट प्रीपेड मीटरची चौकशी व ऑडिट करा !

262

• आम आदमी पार्टीची मागणी

• स्मार्ट प्रीपेड मीटरची चौकशी व ऑडिट करा !

चंद्रपूर : किरण घाटे

चंद्रपूर शहराच्या बापूपेठ परिसरामध्ये अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे अनेक नागरिकांना वाढीव व अनियमित बिल येत असून परिसरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाल्या आहेत.
आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाला निवेदन देऊन बापूपेठमधील सर्व स्मार्ट प्रीपेड मीटरचे तात्काळ ऑडिट व तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, ऑडिट पूर्ण होईपर्यंत नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने थांबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
जर मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
यावेळी आपचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संघटन मंत्री संतोष बोपचे, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, बाबुपेठ अध्यक्ष राजू तोंडासे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, हर्षल नेवलकर, जयदेव देवगडे, मनीष राऊत, अनुप तेलतुंबडे, प्रामुख्याने उपस्थित होते.