⬜⬜भारत मातेचा सैनिक !
भारत मातेचा सैनिक
माता पित्यांचा पुत्र
देशसेवेच्या संरक्षणार्थ
हाती घेती रक्षण सूत्रे….
परिवाराची मोहमाया
सोडूनि जाती लढायला
पुढे पुढेच जायचे आता
ध्येय मनी गाठायला….
जय जवान जय किसान
नारा लावुनी घेती धाव
रनांगणी क्रांती घडूनि
येई हो विश्वाचे नाव…
अखेर जिंकूनी येती
नाव मिळवूनी देशाचे
सन्मानाने तिरंगा फडके
घरोघरी तिरंगा मानाचे…
कित्येक होती गतप्राण
त्या मातेची आरोळी
जे परत येई सैनिक
तिथे साजरी दिवाळी…
सर्व धर्म असे समभाव
करू या वंदन भारताला
जय हिंद जय हिंद
नारा देई स्फूर्ती मनाला..
🟠सौ .शैला चिमड्यालवार
सहज सुचलं मार्गदर्शिका सावली
