⬜🟡⬜🔘पैंजण 🔘🟠⬜
नाजूक माझ्या पायात
आहे पैंजण चांदीचे
कोरलेले जाळीदार
नक्षीकाम घुंगराचे……1
मंजुळ आवाज होतो
नाजूक त्या पैंजणाचा
मनात माझ्या काहूर
सख्या तुझ्याच प्रेमाचा….2
स्त्रीत्वाचा सोळा शिंगार
पैंजणाला त्यात मान
चांदीचा एक दागिना
पायी शोभे किती छान….3
घालून चाळ पायात
आले सौभाग्य दारात
नार देखणी नटून
दिसे उठून घरात…..4
सकारात्मक ऊर्जेला
वाव देईल पैंजण
घुंगराच्या आवाजाने
आनंदीत झाले मन…….5
🟧सौ. वैजयंती विकास गहूकर
सहज सुचलं सदस्य चंद्रपूर
