Home Breaking News ⬜⬜⬜ तिरंगा ⬜⬜⬜

⬜⬜⬜ तिरंगा ⬜⬜⬜

121

⬜⬜⬜ तिरंगा ⬜⬜⬜

स्वातंत्र्यासाठी दिले
अनेकांनी बलिदान
बलिदानातून हुतात्म्यांच्या
मिळाले स्वातंत्र्याचे दान //१//

डौलाने डोलू लागला
तिरंगा आकाशी छान
अशा तिरंग्याचा असे
आम्हां सार्थ अभिमान //२//

तिरंग्याचे तीन रंग
संदेश देई मानवास
शौर्य,शांती, हरितक्रांतीचा
सदा घडो सहवास//३//

तिरंगा आमचा असे
आमची आण,बाण,शान
प्रत्येक भारतीय करतो
तिरंग्याचा सन्मान //४//

🌸⬜कु.मंगल शामराव मिसाळ
सहज सुचलं काव्यकुंज
सदस्य ठाणे